Video: ४९ वर्षीय अभिनेत्याचा २१ वर्षीय अभिनेत्रीसोबत लिपलॉक, व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पत्नी आलियासोबतच्या बिघडलेल्या नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दोघांमधील भांडणाचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. दरम्यान, 49 वर्षीय नवाजुद्दीन आणि 21 वर्षीय अभिनेत्री अवनीत कौर यांच्या लिपलॉक किसने सोशल प्लॅटफॉर्मवर खळबळ उडवून दिली आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि अवनीत कौर (Avneet Kaur) यांची प्रमुख भूमिका असलेला टिकू वेड्स शेरू (Tiku Weds Sheru) हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अॅमेझॉन प्राइम प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज होणार आहे. बुधवारी लॉन्च झाल्यानंतर या चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन आणि अवनीत कौर लिपलॉक किस करताना दिसत आहेत.

अवनीत कौरचा पहिला चित्रपट
अभिनेत्री कंगना राणौत साई कबीर दिग्दर्शित टिकू वेड्स शेरू या चित्रपटाची निर्माती आहे. अवनीत कौरचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा शेरूच्या (नवाजुद्दीन) आसपास फिरते, जो मुंबईत करिअर करण्यासाठी धडपडतो. शेरूच्या लग्नासाठी घरातील लोक भोपाळची मुलगी टिकू (अवनीत) ला पसंत करतात. मुंबईला जाऊन अभिनेत्री होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी टिकूनेही लग्नाला होकार देते आणि सुरू होते खरी धमाल.

नवाजुद्दीनच्या निवडीवर प्रश्न उपस्थित झाले 
नवाजुद्दीन आणि अवनीतच्या लिपलॉक किसिंग सीननंतर सोशल मीडियावर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले – नवाजचा आता बचाव करता येणार नाही. खूप झाला आउटसाइडर.  आणखी एका यूजरने लिहिले – नवाजुद्दीनच्या चित्रपटांशी संबंधित निवडीला काय झाले आहे.