Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी मंत्र्याचा शिवसेनेत प्रवेश
![Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी मंत्र्याचा शिवसेनेत प्रवेश](https://i0.wp.com/azadmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Thackeray-Shinde.webp?resize=750%2C400&ssl=1)
Uddhav Thackeray | माजी सहकार राज्यमंत्री आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गेल्या काही वर्षांपासून पक्षात डावलले गेल्याने तसेच लोकसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे न जाणून घेता परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे व्यथित होऊन त्यांनी उबाठा सेनेची साथ सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय नहाटा, हिंगोलीचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, उपजिल्हाप्रमुख राजू चापके आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Shikhar Bank Scam | शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंचा आक्षेप
Chhagan Bhujbal | ‘पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नाही,’ छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य
Nilesh Lanke | “मला गजा मारणेची पार्श्वभूमी माहिती नव्हती, ती भेट अपघात”; निलेश लंकेंचे स्पष्टीकरण