विराटला आला पाकिस्तानी फलंदाजाचा राग, मग भर मैदानात लाखो लोकांपुढे केलं असं काही – Video

India vs Pakistan World Cup 2023: आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (14 ऑक्टोबर) भारतीय संघ आणि पाकिस्तान यांच्यात मोठा सामना झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) एक लाखाहून अधिक क्षमतेच्या या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) चर्चेत राहिला.

पहिली घटना म्हणजे कोहली चुकीची जर्सी (Virat Kohli Jersey) घालून सामन्यात दाखल झाला होता. आपली चूक लक्षात येताच त्याने लगेच जर्सी बदलली. याशिवाय कोहलीही संतापलेला दिसला. तो पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानवर (Mohammad Rizwan) चिडला.

सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाने 13व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आपली दुसरी विकेट गमावली. त्यानंतर संघाची धावसंख्या 73 अशी होती. यानंतर यष्टीरक्षक रिझवान चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला. मात्र यादरम्यान त्याच्याकडून चूक झाली.

रिझवानला मैदानावर येण्यास आणि खेळ सुरू करण्यास बराच विलंब झाला. विराट कोहलीला हे आवडले नाही आणि त्याने क्षेत्ररक्षण करताना रिजवानला ट्रोल करायला सुरुवात केली. कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो वारंवार त्याच्या मनगटाच्या घड्याळाकडे पाहिल्यासारखे वागताना दिसत (Virat Kohli Tease Mohammad Rizwan) आहे.

महत्वाच्या बातम्या-

…तर मनोज जरांगेंपेक्षा मोठं आंदोलन उभं करू; ओबीसी महासंघाचा इशारा

मी अजितदादांना विनंती करतो छगन भुजबळांना जरा समज द्या,नाहीतर ते – जरांगे पाटील

मराठ्यांच्या ढाण्या वाघाची डरकाळी; मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा