अरे चम्या तुझं कोण कुत्र तरी ऐकतो का? निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंची उडवली खिल्ली

काल गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाने बाजी मारली, तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसे अभूतपूर्व यश संपादन केले. या दोन मोठ्या निवडणूकांच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकाही लवकरच लागाव्यात, अशी मागणी केली.

“गुजरात, हिमाचल प्रदेशमधील विजयी उमेदवारांचे मी अभिनंदन करतो. आतातरी महाराष्ट्राच्या निवडणुका लावाव्यात. मुंबई, ठाणे, पुणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका बाकी आहेत. तसेच महाराष्ट्रातही आता लोकशाही पद्धतीने निवडणुका होऊन जाऊद्या”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

आता भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आदित्य ठाकरे यांच्या या भाष्याची खिल्ली उडवली आहे. “अरे चम्या तुझं कोण कुत्र तरी ऐकतो का?? रोज उठून तू बेअक्कल आहेस ते दाखवू नको, जर तुला खरंच वाटत असेल निवडणुका व्हाव्यात तर जा कोर्टात आणि बघ कोर्टातून काय उत्तर येतं”, असं म्हणत निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचं हसू केलं आहे.