सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शिंदे सरकारचा दिलासा, आता सरसकट पाच वर्षांसाठी परवानगी मिळणार

Ganesh Festival: राज्यात हिंदु सणांचं वैभव वाढवण्यासाठी झटणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आता सरसकट पाच वर्षांसाठी परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री आ. दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे या मंडळांना दरवर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांचे खेटे मारावे लागणार नाहीत. मुंबईसह पुणे आणि राज्यातील इतर भागांतील मंडळांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव जवळ आला की, राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू होते. एकट्या मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध परवानग्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे खेटे घालावे लागतात. यात अनेक मंडळांची अडवणूक होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली या सर्व मंडळांना सरसकट पाच वर्षांची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मंत्री केसरकर यांनी दिली. या निर्णयामुळे सर्व मंडळांना मोठा दिलासा मिळेल. तसंच गणेशोत्सवासारखा विघ्नहर्त्याचा सण निर्विघ्न पार पडेल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली

https://youtu.be/igs_KEHGv_g?si=-dHV1iQBLGLbEBd_

महत्त्वाच्या बातम्या-
संभाजी भिडेंच्या विरोधात कारवाई होत नसल्याने तुषार गांधी ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा

‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ पुस्तकाचे होणार Mohan Bhgwat यांच्या हस्ते प्रकाशन

‘नवीन आरोग्यकेंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरीसह श्रेणीवर्धन व पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा’