ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले त्याच नराधमाने तिला बनवले कॉल गर्ल

बोधगया  – बोधगया येथे एका नराधमाने आधी एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल (Blackmail)  करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर व्हिडिओची धमकी (Threat) देऊन त्याने तरुणीला कॉल गर्ल  (Call girl) बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Bihar Call girl)

आरोपी तरुणाने अश्लील व्हिडिओच्या (porn video) आधारे तिला कॉल गर्ल बनवले. तो एवढ्यावरच थांबला नाही, त्या मुलीला पाटणा, मुंबई (Mumbai) आणि देशाच्या इतर ठिकाणी कॉल गर्ल म्हणून पाठवायला लागला. पीडितेने सांगितले की, जेव्हा तिला आरोपी विवाहित असल्याचे समजले तेव्हा तिने त्याच्यापासून अंतर राखण्यास सुरुवात केली.  मात्र आरोपी अनेक वर्षे अश्लील व्हिडिओच्या आधारे तिचा छळ करत होता.

मुलीचे लग्न झाल्यावरही तिचा छळ सुरूच होता. अशा स्थितीत रविवारी या गोष्टींमुळे अस्वस्थ झालेल्या तरुणीने एका हॉटेलमध्येच गोंधळ घातला. यादरम्यान लोकांनी त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली, त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी प्रियकर बोधगया येथील चेरकी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.