असा बाबा सर्वांना हवा! सासरच्या जाचाला कंटाळलेल्या मुलीला वडिलांनी आणलं वाजत गाजत घरी

Viral News: लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा क्षण असतो. परंतु काहीवेळा लग्नानंतर मुलींना सासरी छळाचा सामना करावा लागतो. रांची येथील प्रेम गुप्ता यांच्या मुलीबाबतही असेच काहीसे घडले. मात्र आपल्या मुलीचा सासरी छळ होत असल्याची गोष्ट लक्षात आल्यानंतर प्रेम गुप्ता यांनी जे काही केले, ते कौतुकास्पद आहे.  प्रेम गुप्ता यांनी त्यांच्या मुलीला तिच्या सासरहून वाजत गाजत परत घरी आणले आहे. आपल्या मुलीची छळातून सुटका झाल्याने त्यांनी अशाप्रकारे आनंद व्यक्त केला आहे.

रांची येथील कैलाश नगरमध्ये राहत असलेल्या प्रेम गुप्ता यांनी त्यांची मुली साक्षीचे सचिन नावाच्या मुलाशी लग्न लावून दिले होते. मात्र सचिनचे आधीच लग्न झाले होते. त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा लग्न केले होते. इकडे तिसर्‍या लग्नानंतरही तो साक्षीसोबत राहत नव्हता. इतकेच नव्हे तर तो साक्षीचा छळही करायचा.

लग्नाच्या काही दिवसानंतर सासरी मुलीचा छळ होऊ लागला. पती मुलीला बाहेर काढायचा. लग्नाच्या १ वर्षानंतर साक्षीला कळाले की, ज्याच्यासोबत तिचे लग्न झाले आहे त्याने याआधीच २ लग्न केली आहे. ही गोष्ट साक्षीला समजताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. परंतु छळ आणि अत्याचाराला कंटाळून या नात्यात राहणे कठीण आहे हे कळल्यानंतर साक्षीने नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

 

साक्षीच्या वडिलांनी आणि तिच्या घरच्यांनी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यानंतर सासरहून माहेरी आणताना बँडबाजा, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मुलीची छळातून सुटका झाल्याने वडिलांनी आनंद व्यक्त केला. साक्षीने नवऱ्यासोबत घटस्फोट देण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. नवऱ्याने पोटगी द्यावी अशी तिची मागणी आहे.

प्रेम गुप्ता यांनी साक्षीला सन्मानाने घरी परत आणतानाचा व्हिडीओ आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केला आणि लिहिले. की जेव्हा तुमच्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात आणि दिखाऊपणाने केले जाते आणि जर तुमचा जोडीदार आणि कुटुंब चुकीचे किंवा चुकीचे काम करत असेल तर तुम्हाला तुमच्या मुलीला तुमच्या घरी परत घेऊन जावे लागेल. कारण मुली खूप मौल्यवान असतात.

https://youtu.be/tr2tvuJfQq4?si=M8a1sEkkAwwC09hl

महत्वाच्या बातम्या-

सत्य विरुद्ध सत्ता च्या लढाईसाठी राष्ट्रवादी सज्ज; शरद पवारांनी घेतला सात लोकसभा मतदार संघाचा आढावा

ललितने सात किलो चांदी न नेता फक्त पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम नेत केले पलायन ?

शरद पवार सुप्रिया सुळे यांना हमासच्या बाजूने लढण्यासाठी गाझाला पाठवतील – सरमा