सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन आलं समोर;  दोन आरोपी पुण्याचे

पुणे –   पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Punjabi singer Sidhu Musewala) यांच्या हत्या प्रकरणामुळे अवघ्या देशभरात एकच खळबळ उडाली आहे. यातच आता या  प्रकरणाचं पुणे कनेक्शन (Pune connection) आता समोर आलं आहे. सिद्धू यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपी पुण्याचे असल्याची माहिती हाती आली आहे. आरोपी संतोष जाधव, सौरव महाकाल (Accused Santosh Jadhav, Sourav Mahakal) या दोघांचं पुणे कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे.

मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात 8 लोकांची छायाचित्रं समोर आली होती. त्यापैकी एकाला देहरादूनमधून पकडलं आहे. तर संतोष आणि सौरव हे दोघं पुण्यातील असल्याची माहिती आहे. संतोष जाधवचं नाव पुणे मंचरमधील गुन्हेगार  ओंकार उर्फ़ राण्या बाणखेलेच्या हत्या प्रकरणात समोर आलं होतं. ओंकारच्या हत्या प्रकरणात  संतोष जाधव फरार आहे.

दोन वर्षापासून खून केल्यानंतर संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ फरार आहेत. हे दोघंही पंजाबमध्ये राहत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. हे दोघे ही लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीमधले असल्याचे समोर आलं आहे.