सेनेच्या बालेकिल्ल्याला भगदाड; मराठवाड्यातील अनेक आमदार शिंदे यांच्या पाठीशी

मुंबई – शिवसेनेतील (Shivsena) महत्त्वाचे नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याचे वृत्त आहे. शिंदे हे सध्या गुजरातमध्ये (Eknath Shinde in Gujarat) गेले असून राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार (Thackeray Gov) अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार असल्याची चर्चा आहे.

शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भूमिकाही आता समोर आली आहे. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपसोबत (BJP) जाण्यास हे नेते इच्छुक आहेत अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडात मराठवाड्यातील (Marathwada) सहा आमदारांची नावे समोर येत आहेत.

औरंगाबादसारख्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यातील दोन मंत्र्यांसकट चार कट्टर आमदारांचा समावेश असल्याचे समजल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मंत्रिमंडळातील संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) व अब्दुल सत्तार (Abdul Sattar)  यांच्यासकट औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट, वैजापूरचे रमेश बोरणारे, परंड्याचे तानाजी सावंत, उमरग्याचे ज्ञानराज चौगुले हे सहा आमदार शिंदे यांच्या सोबत आहेत. .