भाजपने राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना दिली उमेदवारी, भाजपच्या बैठकीत निर्णय

नवी दिल्ली : भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीए (NDA) आघाडीच्या उमेदवाराच्या नावावर विचारमंथन करण्यासाठी मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयात भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. बैठकीनंतर जेपी नड्डा (JP Nadda) यांनी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असतील अशी घोषणा केली.( BJP nominates Draupadi Murmu for President’s post, decision in BJP meeting)

जेपी नड्डा म्हणाले की, आजच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत भाजप आणि एनडीएने आपल्या सर्व घटक पक्षांसोबत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा केली. यानंतर द्रौपदी मुर्मू यांना एनडीएने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. बैठकीत सुमारे 20 नावांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही विरोधी पक्षांशीही सल्लामसलत करण्याचा प्रयत्न केला, परंतु यातून काही निष्पन्न झाले नाही. यूपीएने उमेदवार जाहीर केला आहे, असं ही ते म्हणाले.

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी संयुक्त उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून सिन्हा यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर आता पुढील राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होत आहे.