आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हीच प्रभू श्रीरामाची खरी पूजा; सावित्रीच्या लेकींनी नाकारली प्राणप्रतिष्ठेची सुट्टी

Rohit Pawar: २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू रामाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भारतभरात मोठा दीपोत्सव साजरा होत आहे. केंद्र सरकारने या खास दिनी सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत राज्य सरकारनेही २२ जानेवारीला सरकारी शाळा, कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. परंतु आम्हाला अयोध्येतील मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त सुट्टी नको. आमचा अभ्यास बुडला, तर राम लल्ला सुद्धा खुश होणार नाही, असं म्हणत विद्यार्थिनींनी २२ जानेवारीची सुट्टी नाकारली. प्रख्यात नृत्यांगना आणि ‘स्मितालय’च्या अध्यक्षा झेलम परांजपे यांच्या शाळेतील विद्यार्थिनींनी ही सुट्टी नाकारली आहे.

शिवाजी मानकर

त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लिहिले की, आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हीच प्रभू श्रीरामाची खरी पूजा आहे, असं मानून २२ जानेवारी रोजी सुट्टी नाकारणाऱ्या या संस्थेचा आणि तिथं शिकणाऱ्या सावित्रीमाईंच्या लेकिंचा गर्व वाटतो!, असे त्यांनी एक्स वर पोस्ट करत म्हटले आहे.