सुभाषबापूंच्या चिरंजीवाची पक्षाने केली मोठ्या पदावर नियुक्ती

सोलापूर :  भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी सहकारी मंत्री आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांचे चिरंजीव मनीष देशमुख (Manish Deshmukh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनीष देशमुख हे सध्या लोकमंगल परिवाराचे संचालक आहेत.

भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी देशमुख यांच्या नावाची घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. सुभाष देशमुख हे सध्या दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार आहेत. मागील देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते राज्याचे सहकार मंत्री होते.