Breaking : संजय राऊत यांना मोठा धक्का, कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर यांना अटक

मुंबई – खासदार संजय राऊतांचे अत्यंत निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. BMC कोविड घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई केली आहे.(BMC Covid Scam Case).  खासदार संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पाटकर यांना आता कोर्टात हजर केलं जाणार असल्याची शक्यता आहे.

कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मुंबईत अनेक ठिकाणी जम्बो कोविड सेंटर्स उभारण्यात आले होते. त्यावेळी मुंबई महापालिकेकडून कोविड सेंटर्सचे कॉन्ट्रॅक्ट पात्रता नसलेल्या लोकांना देण्यात आले होते. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला होता. तसेच, जेवढ्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात आले आहेत. त्या कोणत्याही कंपन्या अनुभवी नव्हत्या. तसेच, त्या कोवि़च्या काही काळापूर्वीच स्थापन झाल्या होत्या. अनेक नियम डावलून या कंपन्यांना महापालिकेच्या वतीनं कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात आले होते.