Nashik : सीमा सुरक्षा दलातील जवान गायत्री जाधव 23 व्या वर्षीच काळाच्या पडद्याआड, निफाडवर शोककळा

नाशिक –  बथनाहा, जिल्हा अररिया, बिहार येथे सीमा सुरक्षा दलात (BSF) कार्यरत असणारी देवगाव येथील कु. गायत्री विठ्ठल जाधव (वय २३)(Gayatri Jadhav)   हीचे  नुकतेच ग्रामीण रुग्णालयात खूप तब्येत खालावल्याने निधन झाले. गायत्री अत्यंत बुद्धिमान व जिद्दी असल्याने आधीपासुनच सैन्यात जाण्याचा तिचा मानस होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातुन सैन्यात जाणाऱ्या पहिल्या दोन मुलींमध्ये व निफाड तालुक्यातून सैन्यात जाणारी ती पहिली मुलगी होती.

‘मी आई बापासाठी काहीही करू शकले नाही मात्र माझ्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडू नका’ असं म्हणत गायत्री जाधवने वयाच्या 23 व्या वर्षीच या जगाला निरोप दिला. तिच्या जाण्याने संपूर्ण निफाड तालुक्यावर शोककळा पसरलीय. गायत्रीवर उपचार करण्यासाठी तब्बल 10 महिने कुटुंबाने सर्वतोपरी प्रयत्न केले होते, मात्र हे सर्व अपयशी ठरले.

प्रशिक्षणावेळी गायत्री खड्ड्यात पडली त्यावेळी तिच्या डोक्याला दुखापत झाल्याने जखमी झाली होती. जखमी झाल्यावर तिच्यावर जयपूर  इथं शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर ती पुन्हा प्रशिक्षणसाठी रुजू झाली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ती बिहारच्या बथनाहा इथे कर्तव्यावर रुजू झाली. मात्र तिथे तिला त्रास जाणवू लागल्याने ती सुट्टी घेऊन घरी आली. मुंबई आणि नाशिक दोन्ही ठिकाणी तिने उपचार घेतले. उपचार घेऊनही तिची प्रकृती सुधारत नसल्याने तिला दिल्लीला घेऊन जाणार होते. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला. गायत्रीच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची त्या चार बहिणी असून उपचारासाठी तब्बल ८ लाख रुपये खर्च आला आहे.