Sunil Tatkare | राहुल गांधी अपरिपक्व नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे

Sunil Tatkare | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पुन्हा पंतप्रधान झाले तर देशाची राज्यघटना बदलली जाईल असे आरेाप करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अपरिपक्व नेतृत्व आहे. 370 कलम, सीएए कायदा आदिविषयी अल्पसंख्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे, पण तो आम्ही दुर करीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या प्रचारासाठी तटकरे पुण्यात आले आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर,कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, भाजपा प्रदेश प्रवक्ते संजय मयेकर, प्रसिध्दी सहप्रमुख हेमंत लेले उपस्थित होते.

इंडिया आघाडीकडून सातत्याने खोटा प्रचार केला जात आहे. संविधान आणि लोकशाही धोक्यात आली असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यावरून टिका केली जात आहे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र जनता सुज्ञ आहे. महायुतीच्या पाठिमागे जनता उभी असून बारामतीमध्ये मोठ्या फरकाने आमचा विजय होणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

भाजपबरोबर सत्‍ता स्थापनेचा तीन वेळा निर्णय झाला होता. 2014 आणि 2016 मध्ये शिवसेना हा सत्तेमध्ये सहभागी असेल. शिवसेना आमचा जुना मित्र असल्यामुळे त्यांच्याबरोबरची युती तोडणार नाही असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले होते. 2019 मध्ये भाजपबरोबर जाण्याचा निर्णय झाला होता. पक्षातील सर्वांनी पाठिंब्याच्या पत्रावर स्वाक्षरी केल्या होत्या. त्यामुळे अन्य कारणासाठी पक्षातून बाहेर पडले असे म्हणण्यात काहीच अर्थ नसल्याचे तटकरे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन

Ajit Pawar | शिवसंस्कारसृष्टीची वडजची जागा हडपण्याचा प्रयत्न, अजित पवारांचा कोल्हेंवर नाव न घेत घणाघात

Ravindra Dhangekar | पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती