Chandrahar Patil | “पळकुटू पळून गेले अन् मर्द शिवसेनेत आले”, चंद्रहार पाटलांच्या प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंची छाती फुलली

Double Maharashtra Kesari Chandrahar Patil | नुकताच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केला आहे. असे असतानाच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नवा ‘वजनदार’ नेता मिळाला आहे. महाराष्ट्र केसरीचा दुहेरी किताब मिळविलेले पैलवान चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीवर मशाल हातील घेत ते शिवसेना ठाकरे गटात सामील झाले आहेत.

चंद्रहार पाटील यांच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, चंद्रहार यांचे मातोश्रीवर स्वागत आहे. आज माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे. छाती किती इंच झाली ते काही मी सांगू शकत नाही. पण मर्दाची छाती बघितल्यानंतर सांगलीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याशी लढण्याची कुणाची छाती होणार नाही. पक्षातले पळपुटे पळून जात आहेत, पण मर्द सहभागी होत आहेत. कारण शिवसेना ही नेहमी मर्दांची संघटना आहे.’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sharad Pawar | ‘दहा वर्षाच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात शरद पवार यांनी एकही शेतकरी हिताचे कार्य केले नाही’

Baramati Lok Sabha Elections | बारामतीमधील लढाई लक्ष्यवेधी ठरणार; अजितदादांच्या पुढच्या चालीकडे सर्वांचे लक्ष

Devendra Fadnavis | विकासपूरक धोरणामुळे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य