Chandrahar Patil | डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी हाती घेतली मशाल, शिवसेना उद्धव ठाकरे गटात केला प्रवेश

Double Maharashtra Kesari Chandrahar Patil | नुकताच उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. असे असतानाच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नवा ‘वजनदार’ नेता मिळाला आहे. महाराष्ट्र केसरीचा दुहेरी किताब मिळविलेले पैलवान चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निवासस्थान मातोश्रीवर मशाल हातील घेत ते शिवसेना ठाकरे गटात सामील झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) होते. मात्र त्यांनी आता उधद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या अगोदर पाटील यांनी जिल्हा परिषदेची एकमेव निवडणूक लढली आणि जिंकली होती. त्यानंतर ते दोनदा महाराष्ट्र केसरी झाले होते. मात्र जागा आरक्षित झाल्याने दरम्यानच्या काळात त्यांना संधी मिळाल्या नाहीत. मात्र जयंत पाटील यांच्या नेतृत्वात त्यांचे काम सुरू होते. मात्र गेल्या वर्षभरापासून ते लोकसभेची तयारी करत होते. आता शिवसेना पक्षातून ते लोकसभेवर जात विजय मिळवण्यात यशस्वी होऊ शकतील का? हे पाहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या :

Sharad Pawar | ‘दहा वर्षाच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात शरद पवार यांनी एकही शेतकरी हिताचे कार्य केले नाही’

Baramati Lok Sabha Elections | बारामतीमधील लढाई लक्ष्यवेधी ठरणार; अजितदादांच्या पुढच्या चालीकडे सर्वांचे लक्ष

Devendra Fadnavis | विकासपूरक धोरणामुळे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य