पाकिस्तानी क्रिकेटरने सांगितली आतल्या गोटातील बातमी! Pak खेळाडूंना ५ महिन्यांपासून मिळाला नाही पगार

Pakistan Cricket Team: पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने (Rashid Latif) खळबळजनक दावा केला आहे. पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ (PCB Chairman Zaka Ashraf) यांनी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) कॉल आणि एसएमएसला प्रतिसाद देणे बंद केले आहे. याशिवाय रशीद लतीफ म्हणाले की, पाकिस्तानी खेळाडूंना पाच महिन्यांपासून पगारही (Pakistani Cricketers Salary) मिळालेला नाही.

उल्लेखनीय म्हणजे विश्वचषकात सातत्याने निराशाजनक कामगिरी करणाऱ्या पाकिस्तान संघाला आपल्या देशात टीकेला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज रशीद लतीफ याने खुलासा केला की, पाकिस्तानच्या खेळाडूंना पाच महिन्यांपासून त्यांचे वेतनही मिळालेले नाही. पाकिस्तानच्या सरकारी टीव्ही चॅनलवर बोलताना राशिदने हा खुलासा केला आहे.

रशीद लतीफ म्हणाला, “मला हे माहित आहे की बाबरने भारतातून फोन केला आणि संदेश पाठवला तेव्हा त्याला चेअरमन (झका अश्रफ) कडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. खेळाडूंना त्यांचे वेतन मिळालेले नाही. अध्यक्षांनी कर्णधाराला उत्तर दिलेले नाही आणि या परिस्थितीत आम्ही संघाकडून काय अपेक्षा करतो. ”

पाकिस्तानला सध्याच्या विश्वचषक स्पर्धेत सहा पैकी चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा कमी झाल्या आहेत. केंद्रीय करारानुसार खेळाडूंचे किमान चार ते पाच महिन्यांचे पगार थकीत असल्याचा आरोप लतीफ यांनी केला. बोर्डाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विश्वचषक स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी ज्या केंद्रीय करारांवर स्वाक्षरी केली होती, त्याचे आता पुनरावलोकन केले जात असल्याची माहिती बोर्डाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली असल्याचा दावाही लतीफने केला. तथापि, त्याने आपल्या दाव्यासाठी कोणतेही पुरावे दिले नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

‘मुस्लीम मुलांना महाविद्यालयात जायला वेळ नसतो मात्र जुगार खेळण्यासाठी, दुसऱ्यांना फसवण्यासाठी वेळ असतो’

ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या – Ramdas Kadam

मी ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातं; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली खंत