Dinesh Karthik | ‘आरसीबीच्या चाहत्यांमुळे माझी टीम इंडियात निवड झाली…’, दिनेश कार्तिकने मानले आभार

Dinesh Karthik | अलीकडेच, आयपीएल 2024 च्या एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव केला. या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हंगामातील प्रवास संपुष्टात आला. तसेच, या सामन्यासह आरसीबीचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने निवृत्ती जाहीर केली. मात्र, आता दिनेश कार्तिकने सांगितले की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांमुळेच त्याला टीम इंडियाला पुनरागमन करता आले. याशिवाय दिनेश कार्तिकने त्याच्या कारकिर्दीतील चढ-उताराचे विविध पैलू पाहिले.

‘आरसीबीच्या चाहत्यांमुळे माझी टीम इंडियात निवड झाली…’
दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) सांगितले की, 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी मला टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले, अशा प्रकारे मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पण माझा विश्वास आहे की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांमुळे माझी 2022च्या टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियात निवड झाली, कारण तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे चाहते मोठ्या संख्येने सांगत होते की, दिनेश कार्तिकला टी-20 विश्वचषक संघात असावा. अशाप्रकारे मी वयाच्या 37 व्या वर्षी पुनरागमन करू शकलो, या गोष्टी मी कधीही विसरू शकत नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांनी माझ्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली.

दिनेश कार्तिकची कारकीर्द अशी होती
दिनेश कार्तिकने 2004 मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. अशा प्रकारे तो जवळपास 20 वर्षे व्यावसायिक क्रिकेट खेळत राहिला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व्यतिरिक्त, दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्सचा भाग होता. तसेच, आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दिनेश कार्तिकचा समावेश आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप