छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना असा दाखवला ‘कात्रजचा घाट’

Mumbai – राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक मोठा गट भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाला आहे. (NCP split) राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली..(Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister.)

मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ (Chhagan Bhujbal), दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

दरम्यान, तिकडे काय होतंय, ते बघून येतो असं शरद (Sharad Pawar) पवारांना सांगून भुजबळ जे गेले ते थेट त्यांनी मंत्रिपदाची शपथच घेतली. छगन भुजबळ यांनी दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या घडामोडी घडत असताना छगन भुजबळ यांनी मला फोन केला. तिकडे काय होतंय, ते बघून येतो असे ते म्हणाले. नंतर थोड्याच वेळात छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याचे समजले. असा गौप्यस्फोट शरद पवारांनी काल केला.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांसह 9 मंत्र्यांवर कारवाई करण्याचा इशारा पवारांनी दिला आहे. आपण न्यायालयीन लढा लढणार नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार, असं पवारांनी स्पष्ट केलं.