Chinmay Mandlekar | “इथून पुढे शिवरायांच्या भूमिका करणार नाही”; मुलाच्या ‘जहांगीर’ नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगमुळे चिन्मयचा मोठा निर्णय

Chinmay Mandlekar | चाहत्यांना सेलिब्रिटींच्या अभिनय, चित्रपटाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रचंड रस असतो. फिल्मी दुनियेबाहेर अभिनेते वा अभिनेत्री कसे कपडे घालतात, काय खातात, त्यांचे कुटुंबीय अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. बऱ्याचदा सेलिब्रिटींबद्दल चाहते आपली मतेही मांडताना दिसतात. मात्र काहीवेळा त्यांच्याकडून मर्यादा ओलांडल्या जातात. मराठी व हिंदी चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांनी त्यांच्या मुलाचे नाव जहांगीर असे ठेवले आहे. यावरुन गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे.

जहांगीर हे मुस्लिम नाव आहे. त्यामुळे तुम्ही ‘भारत सोडून जा’, ‘अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानात राहायला जा’, असे मेसेज केले जात आहेत. हे पाहून चिन्मयची पत्नी नेहा मांडलेकर भडकली. नेहा मांडलेकरने एक व्हिडिओ पोस्ट करत चागत्यांवर त्रागा व्यक्त केला. त्यानंतर आता चिन्मयने मोठे पाऊल उचलले आहे. चिन्मयने व्हिडीओ शेअर करुन या पुढे छत्रपती शिवरायांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार या चित्रपटांमध्ये चिन्मयनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

काय म्हणाला चिन्मय?
चिन्मय (Chinmay Mandlekar ) व्हिडीओमध्ये म्हणाला, “नमस्कार, माझं नाव चिन्मय मांडलेकर. व्यवसायाने मी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे.काल माझी पत्नी नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ माझ्या मुलाच्या जहांगीर या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दलचा आहे. माझ्या कुटुंबाबद्दल अतिशय घाणेरड्या आणि अश्लाघ्य कमेंट्स पास केल्या जात आहेत. माझ्या पत्नीनं व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर देखील लोक कमेंट्स करत आहेत. आता लोकं मुलाच्या पितृत्वापासून ते आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावर शंका घेऊ लागलेत. एक व्यक्ती म्हणून मला या गोष्टीचा खूप त्रास होत आहे.”

“मी अभिनेता आहे पण म्हणून माझ्या मुलाला किंवा पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास जर सोशल मीडियावरुन होत असेल तर त्याच्याशी मी बांधील नाही. माझ्या कामावरुन मला वाटेल ते बोलू शकता, तुम्हाला ते आवडलं नाही आवडलं पण माझ्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे, असं मला वाटत नाही. मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं? यावर मी आधाीही बऱ्याच मुलाखतींमध्ये बोललो आहोत. माझ्या पत्नीनेही काल व्हिडीओमध्ये याबद्दल सांगितलं आहे. त्यामुळे हे मी ते बोलून वेळ वाया घालवत नाही.मी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारतो. आतापर्यंत सहा सिनेमांमध्ये मी ही भूमिका केली आहे, तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का आहे? हा ट्रोलर्सचा प्रमुख सूर आहे.”, असंही चिन्मय म्हणाला.

“माझ्या मुलाचा जन्म 2013 साली झाला आज तो 11 वर्षांचा आहे. हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं ते आता होतंय. मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेने आतापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राच्या बाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं. फक्त मराठीच नाही अमराठी लोकांचंही प्रेम दिलं. पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशाप्रकारे त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रपणे सांगतो की, इथून पुढे मी ही भूमिका साकारणार नाही. कारण मी करत असलेलं काम, मी केलेली भूमिका, या गोष्टींचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल तर वडील, नवरा, कुटुंब प्रमुख म्हणून मला माझं कुटुंब जपणं खूप महत्वाचं आहे. मला याचं खूप वाईट वाटतंय कारण माझ्या मनात महाराजांबद्दल जी भक्ती किंवा श्रद्धा आहे तेच मी भूमिकेतून मांडलं. माझ्या गाडीमध्ये देखील जिथे लोक गणपतीची मूर्ती ठेवतात तिथे महाराजांची मूर्ती आहे. हा दिखावा नाहीये प्रेम आहे आणि श्रद्धा आहे. मी या गोष्टीचं स्पष्टीकर देणार नाही”

“नाव खटकतंय म्हणून जहांगीर आर्ट गॅलरीचं नाव बदलणार का? जहांगीर नावाच्याच एका माणसाला आपल्या देशाने भारतरत्न दिलं. भारतरत्न जहांगीर रतनजी दादाभाई टाटा (जेआरडी टाटा)” असंही चिन्मयनं व्हिडीओमध्ये सांगितलं. व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये चिन्मयनं लिहिलं, “छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो”.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Archana Patil | अर्चना पाटील यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत सर्वतोपरी प्रयत्न

Omraje Nimbalkar Vs Archana Patil: धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटील यांची संपत्ती किती?

Uddhav Thackeray | फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा दावा