मुंबईत प्रथमच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समारोह

मुंबई – राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar) यांची 297 वी जयंती मुंबईत दिनांक 31 मे 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता के.सी.कॉलेज सभागृह, चर्चगेट (KC College Hall, Churchgate) येथे साजरी करण्यात येणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil), इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री  विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो-हे (eelam Gorhe), विधान परिषद विरोधी पक्षनेते  प्रविण दरेकर, आमदार  आशिष शेलार, मा.खा.विकास महात्मे उपस्थित राहणार आहेत.

मुंबईत प्रथमच अशी सार्वजनिक जयंती सर्वपक्ष व संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येऊन करीत आहेत. राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रातील समर्पित मान्यवरांचा यावेळी मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीला अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक जयंती समारोह समितीचे अध्यक्ष गणेश हाके (Ganesh Hake) यांनी केले आहे.