Pankaj Tripathi | कार अपघातात अभिनेता पंकज त्रिपाठींच्या भावजीचा मृत्यू, बहिणीची प्रकृतीही गंभीर

बॉलीवूड अभिनेता पंकज त्रिपाठीची (Pankaj Tripathi) बहीण आणि भावजी रस्त्यावर अपघाताचे बळी ठरले आहेत. या अपघातात पंकजचा मेहुणा राजेश तिवारी यांचा मृत्यू झाला, तर पंकजची बहीण सरिता गंभीर जखमी झाली. त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. पंकजचा मेहुणा राजेश हे मुन्ना या नावानेही ओळखले जायचे. ते रेल्वे कर्मचारी होते आणि त्यांची पोस्टिंग चित्तरंजन स्टेशनवर होती. ते बिहारमधील आपल्या गावातून परतत होते. यावेळी जीटी रोडवर धनबादच्या निरसाजवळ त्यांचा अपघात झाला. काही महिन्यांपूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये पंकजने वडिलांना गमावले होते.

शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास निरसा येथे हा अपघात झाला. या अपघातात राजेशचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सरिताला गंभीर अवस्थेत धनबाद मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. त्यांच्यावर येथील स्पेशल युनिटमध्ये उपचार सुरू आहेत.

कार दुभाजकाला धडकली
पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांचा मेहुणा राजेश पश्चिम बंगालमधील चित्तरंजन येथे तैनात होता. त्यांचे गाव बिहारमधील गोपालगंज येथे आहे. कमलपूर येथून ते चित्तरंजन या गावी जात होते. निरसा मार्केट चौकात येण्यापूर्वीच त्यांची कार दुभाजकावर आदळली. गाडीचा वेग खूप जास्त होता. या धडकेत कारच्या पुढील भागाचे पूर्ण नुकसान झाले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने राजेश आणि सरिता यांना कारमधून बाहेर काढले आणि त्यांना तात्काळ धनबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. येथील डॉक्टरांनी अथक प्रयत्न करूनही राजेशला वाचवता आले नाही. दरम्यान, सरिता आयसीयूमध्ये दाखल आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये पंकजने वडील गमावले
पंकज त्रिपाठी यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात वडिलांना गमावले होते. त्यांचे वडील पंडित बनारस तिवारी यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले. त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. यावेळी केवळ जवळचे कुटुंबीयच सहभागी झाले होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Archana Patil | अर्चना पाटील यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत सर्वतोपरी प्रयत्न

Omraje Nimbalkar Vs Archana Patil: धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटील यांची संपत्ती किती?

Uddhav Thackeray | फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा दावा