काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात जोरदार स्वागत

नांदेड/ज्ञानेश्वर राजुरे – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हजारो पेटत्या मशालीच्या उजेडात सोमवारी रात्री महाराष्ट्रात आगमन झाले. नांदेड जिल्ह्यातील देगलूर नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांचे दर्शन घेऊन राहुल गांधी यांनी आपल्या यात्रेच्या महाराष्ट्रातील टप्प्यास प्रारंभ केला.

राहुल गांधी यांनी तेलंगणातून भव्य मशाल यात्रेसह देगलूर येथे आगमन झाले. राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, तसेच माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, महिमा सिंग यांच्यासह काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते राहुल यांच्या समवेत होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात नागरिकांनी राहुल यांच्या आगमनाच्या प्रतीक्षेतमोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

या ठिकाणी उपस्थित जनु समुदायाला संबोधित करताना राहुल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मी देगलूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बोलत आहे. महाराजांचा इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वारसा घेऊन यातून आपण इतिहास घडवू असे सांगून की हे सरकार तरुणांना रोजगार देऊ शकत नाही. शेतकऱ्यांची काय अवस्था आहे याचे देणे घेणे नाही. शेतकरी मजूर यांची गाऱ्हाणे ऐकण्यासाठी मी आलो आहे. या यात्रेतून हिंदुस्तानातील जनतेची मने जोडण्याचे आव्हान त्यांनी केले.

यावेळी या ठिकाणी उपस्थित जनु समुदायाला संबोधित करत राहुल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या या यात्रेस मोठा प्रतिसाद मिळत असून ही यात्रा नांदेड जिल्ह्यात चार दिवस राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र कांग्रेस मध्ये पुन्हा नवं चैतन्य आल्याचे पाहायला मिळत आहे.