BJP | लोकसभेच्या प्रचारासाठी भाजपची आध्यात्मिक आघाडी सज्ज !

भाजपा (BJP) अध्यात्मिक समन्वय आघाडीची प्रदेश पदाधिकारी बैठक महानुभाव आश्रम, छत्रपती संभाजीनगर येथे आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड आणि मा.विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे उपस्थित होते. राज्यभरातून आलेले प्रदेश पदाधिकारी व विविध पंथ संप्रदायांचे एकूण 80 सदस्य बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते दोन ठराव मंजूर करण्यात आले.

ठराव क्र.१

रामराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे अभिनंदन व तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा
या प्रस्तावास पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी राबविलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांचा उहापोह करण्यासोबतच त्यांनी सनातन संस्कृतीला जो सन्मान दिला राम मंदिर ची उभारणी केली व देव देश धर्मासाठी अहोरात्र संकल्प घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घ्यावी यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या हा प्रस्ताव राजेश महाराज देगलूरकर यांनी मांडला व त्यास आचार्य मनीष भाईजी महाराज व डॉ.वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी अनुमोदन दिले.

ठराव.क्र2.

महाराष्ट्रात फोफावलेला विषारी जातीयवाद मिटवण्याचा निर्धार
सर्व जातींना त्यांच्या हक्काचे अधिकार प्रतिनिधित्व व न्याय मिळावा व त्यासाठी त्यांनी संविधानिक मार्गाने आपली बाजू मांडावी या गोष्टीस आध्यात्मिक समन्वय आघाडीचे पूर्ण समर्थन आहे. मात्र दोन जाती एकमेकांविरोधात उभे करणे, जाळपोळ करणे, राजकीय नेत्यांना शिवीगाळ करणे, त्यांना जातीय वाचक संबोधने, या गोष्टीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.ज्ञानोबा तुकोबांपासून स्वामी चक्रधर पंथ पर्यंत व छत्रपती शिवरायांपासून शाहू फुले आंबेडकरांपर्यंत अशा थोर विभूतींची भूमी असलेल्या महाराष्ट्रात हा विषारी जातीयवाद कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही व तो मिटवण्याचा निर्धार अध्यात्मिक समन्वय आघाडी (BJP)करत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

हा प्रस्ताव ह.भ.प.प्रकाश महाराज जवंजाळ यांनी मांडला व त्यास ह.भ.प.संजय नाना महाराज धोंडगे महंत.राधाताई सानप महंत केशराज बाबा महानुभाव यांनी अनुमोदन दिले.

पंतप्रधान मोदींच्या विजयासाठी आध्यात्मिक आघाडी सज्ज; राबवणार ‘संत आशीर्वाद अभियान’
पंतप्रधान मोदींना भाजपाच्या ‘अबकी बार 400 पार’ साठी आध्यात्मिक आघाडी देखील सज्ज झाली असून महाराष्ट्रातील 48 लोकसभांच्या विजयासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले. आध्यात्मिक समन्वय आघाडीचे सर्व पदाधिकारी पुढील महिनाभर आपले घर-दार सोडून राज्यभरातील सर्व साधुसंत महंत कीर्तनकार प्रवचनकार यांच्या भेटी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या तिसऱ्या काळासाठी आशीर्वाद मागणार आहेत. एकूण 5000 पेक्षा जास्त साधुसंत कीर्तनकारांपर्यंत पोहोचण्याचे विशेष नियोजन आजच्या बैठकीत करण्यात आले. या बैठकीचे प्रास्ताविक मराठवाड्याचे अध्यक्ष मा.जि.प अध्यक्ष रामराव शेळके यांनी केले, तर प्रदेश सहसंयोजक संजय जोशी यांनी आभार मानले. सुदर्शन महाराज महानुभाव यांनी सूत्रसंचालन मानले.

महत्वाच्या बातम्या :

पुण्यात मुरलीधर अण्णांचाच विजय पक्का? ‘हे’ फॅक्टर्स मिळवून देणार त्यांना महाविजय?

Sharad Pawar | मोदी साहेब माझ्या बोटाला हात लावू नका, शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा

Amol Kolhe | जे सरकार शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार त्यांचे आदर्श पाळते का?