चिंचवडच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच; ठाकरे गट आणि राष्ट्रवादीने केला दावा 

Pune  : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली असून या दोन्ही जागांवर कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी देण्यात येईल. याची उत्सुकता सगळ्यांना आता लागूून राहिली असताना आता चिंचवडच्या जागेवरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण चिंचवडची जी (Chinchwad By-Election) जागा आहे,त्यावर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीने दावा केला आहे.

चिंचवडची जागा शिवसेनेनं (Shiv Sena) लढावी, असं आमचं मत आहे. तर, पुण्यातील कसबा पेठेच्या जागेबाबत (Kasba Peth By-Election) राष्ट्रवादी (NCP) आणि कॉंग्रेसमध्ये (Congress) निर्णय होईल, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.