होणाऱ्या बायकोचे नको ते फोटो आले मोबाईलवर; फोटो पाठवणाऱ्याने केली अजब मागणी

Crime News :  उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणीचे अश्लील फोटो (pornographic photos) एका तरुणाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवले आणि संबंध तोडण्यास सांगितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ती माझी आहे, तू जर तिला सोडले  नाहीतर बरे होणार नाही अशी धमकी देखील या तरुणाने दिली आहे. मुलीच्या होणाऱ्या नवऱ्याने आता मुरादाबादमधील कटघर पोलीस ठाण्यात या तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

मुरादाबादच्या कटघर पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या या तरुणाने सांगितले की, त्याचे लवकरच लग्न आहे. रामपूर जिल्ह्यातील मिलक पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात हा विवाह होणार आहे. लग्न ठरल्यानंतर आता आरोपी तरून हे नाते तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. तो मुलीचा दूरचा नातेवाईक असल्याचे समजते. निजामाने आपल्या भावी पत्नीचे अश्लील आणि नग्न फोटो त्याला पाठवल्याचा आरोप आहे. तसेच माझे तुझ्या भावी पत्नीशी अनेक दिवसांपासून अवैध संबंध असल्याचे सांगितले. त्याच्याकडे तरुणीचे आणखी अश्लील फोटो आहेत, अशी धमकी दिली.

नाते तुटले नाही तर मुलीचे आणखी अश्लील फोटो नातेवाइकांमध्ये व्हायरल करू, अशी धमकी त्याने दिली आहे. मुलीला बदनाम करण्यासाठी निजाम हे सर्व नाटक करत असल्याचे होणाऱ्या नवऱ्याचे म्हणणे आहे. काटघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मुरादाबाद पोलिसांनी दिल्ली पोलिसांशीही संपर्क साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी विकसित करा- आ. किशोर जोरगेवार

ठग सुकेशला अयोध्या मंदिरात दान करायचा आहे 11 किलो सोन्याचा मुकुट, तुरुंगातून लिहिलेले पत्र

न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणार का? जाणून घ्या समीकरण