EVM च्या नावाने रडगाणे सुरूच;  इलॉन मस्कनंतर राहुल गांधींनीही EVM वर उपस्थित केले प्रश्न 

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (EVM) म्हणजेच ईव्हीएमबाबत नवा वाद सुरू झाला आहे.उद्योगपती एलोन मस्कचा असा विश्वास आहे की आपण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे काढून टाकली पाहिजे कारण ती हॅक केली जाऊ शकतात .इलॉन मस्क आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यानंतर आता काँग्रेस नेते राहुलगांधी यांनीही या वादात उडी घेतली आहे.

राहुल गांधी यांनी आज, १६ जून रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एलोन मस्कची पोस्ट रिट्विट केली आणि म्हटले की,भारतातील ईव्हीएम एक “ब्लॅक बॉक्स” आहे आणि कोणालाही ते तपासण्याची परवानगी नाही.जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाची कमतरता असते तेव्हा लोकशाही धोक्याची बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते असे म्हणत भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

तत्पूर्वी  टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट X वरील पोस्टमध्ये ईव्हीएम (EVM) रद्द करण्याबद्दल बोलल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या टिप्पण्या आल्या आहेत.गांधींनी  त्यांच्या ट्विटमध्ये एक मीडिया रिपोर्ट शेअर केला आहे, ज्यात दावा केला आहे की मुंबईच्या उत्तर-पश्चिममधून 48 मतांनी निवडणूक जिंकलेल्या शिवसेनेच्याएका नातेवाईकाकडे एक फोन होता ज्याद्वारे ईव्हीएम अनलॉक केले जाऊ शकते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप