“आज तंट्या भिल जिवंत असते तर त्यांनी गौतम अदाणींचा खजाना लुटला असता आणि…”

Pune- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांनी आदिवासी समाजातील क्रांतीकारक तंट्या भिल यांचं उदाहरण दिलं आणि ते आज जिवंत असते तर त्यांनी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांचा खजाना लुटला असता, असे वक्तव्य केले आहे. जानेवारी महिन्यात अदानी समुहाच्या हिंडेनबर्ग अहवालाने खळबळ उडाली होती. या अहवालामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले होते आणि समूहाच्या बाजार भांडवलात मोठी घसरण झाली होती.

पुण्यात जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाच्या (महाराष्ट्र) अधिवेशनात अध्यक्षीय भाषणात बोलताना मेधा पाटकर म्हणाल्या, “आज आपण पाहतो की, बिरसा मुंड्या, तंट्या भिल आणि सरदार पटेल यांचे पुतळे उभारले जात आहेत. परंतु प्रत्यक्षात सरदार पटेल यांचा पुतळा उभा करताना ७२ गावे उठवण्यात आली. त्यात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना त्याचा मोबदला देखील देण्यात आला नाही, हे मोदींचं राज्य आहे.”

“तंट्या भिल ब्रिटिशांचा खजाना लुटून गरीबांमध्ये वाटतं होता. आज तंट्या भिल जिवंत असते तर त्यांनी उद्योगपती गौतम अदाणी यांचा खजाना लुटला असता आणि गरीबांमध्ये वाटला असता,” असे मत मेधा पाटकर यांनी यावेळी व्यक्त केले.