Pankaja Munde: ‘मलाही मराठी म्हणून मुंबईत घर नाकारण्यात आलं’, पंकजा मुंडेंनी सांगितला जुना अनुभव

Mulund Incident: मुंबईतील मुलुंड भागात कार्यालयासाठी भाड्याने जागा घेण्यासाठी गेलेल्या मराठी तरुणीला `इथे महाराष्ट्रीयन लोकांना जागा नाही`, असे म्हणत धक्काबुक्की केली. खुद्द महिलेनेच याबाबत सांगितले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही असाच अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

शासकीय बंगला सोडल्यानंतर मी मुंबईत (Marathi Manus) घर शोधायला गेले, तेव्हा मलादेखील मराठी म्हणून घर नाकारण्यात आलं होतं. मराठी लोकांना आमच्या भागात घर देत नाही, हे शब्द मीदेखील अनुभवले आहे, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपल्याबाबतही असे घडल्याचे उघडकीस आणले आहे.

हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाषावाद, प्रांत या विषयावर मी कधी भाष्य करत नाही. परंतु सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहून मन खिन्न होते. मराठी म्हणून जागा नाकारल्यानंतर त्या तरुणीने जो व्हिडिओ टाकला तो संताप आणणारा आहे. राज्यात सध्या आरक्षणावरून वेगवेगळे समाज समोरासमोर येत आहेत, जाती-जातीमध्ये भांडणे सुरू झाल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

https://youtu.be/gCfxHtR26Wo?si=MEthSTF6L7ExyINO

महत्वाच्या बातम्या-

Pune Ganeshotsav 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ?

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा