प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवण्यामागचं कारण; म्हणाले, “हिंद-मुस्लीम दंगल…”

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख, बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीला भेट दिली. येथे पोहोचल्यानंतर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर पुष्प अर्पण केले आणि मस्तक टेकवले होते. आता आपल्या कृतीवर प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टीकरण दिले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राजा म्हणून ५४ वर्ष औरंगजेबाने राज्य केलं आहे. त्याने सुफी परंपरा जपली आणि तशा त्याला चांगल्या आणि वाईट बाजू आहेत. चांगल्या बाजूचं गुणगाण गायलं पाहिजे वाईट बाजू सोडल्या पाहिजेत. मुस्लीमांना कडवटपणा हिंदूचा कडवटपणा उभं करणं चालंलं आहे ते थांबलं पाहिजे.

मी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवली आहेत. याचं कारणं जे चुकीचा समज तयार केला जातो आहे, तसेच हिंदू-मुस्लिम दंगली करण्याचा जो बेत होता, तो मला थांबवायचा होता. माझ्या त्या प्रयत्नाला यश आलं असं मी म्हणतो आणि औरंगजेबाच्या नावाने जी दंगल होणार आहे ती थांबली आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी प्रकाश आंबेडकारांनी यांनी यापूर्वी देखील बरेच राजकीय नेते औरंगजेबाच्या कबरीवर गेले आहेत असेही सांगितले.