‘धाराशिव एक्सप्रेस’ धडाडणार! महाराष्ट्राच्या ‘या’ युवा खेळाडूचे आयपीएल पदार्पण, १४५ किमीच्या वेगाने करतो गोलंदाजी

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स संघात आयपीएल २०२३ चा पहिला सामना होत आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने युवा खेळाडू राजवर्धन हंगारगेकर (Rajvardhan Hangargekar) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. परिणामी राजवर्धन गुजरातविरुद्ध त्याचे आयपीएल पदार्पण करेल.

२० वर्षीय राजवर्धन याला चेन्नईने गतवर्षी दीड कोटींना विकत घेतले होते. महाराष्ट्रातील धाराशिवचा रहिवासी असलेल्या राजवर्धनच्या वडिलांचे २०२० मध्ये कोरोनामुळे निधन झाले होते. राजवर्धन हा सातत्याने १४५ किमी वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. तसेच तो खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत मोठे फटके खेळू शकतो. गतवर्षी त्याच्यावर वय लपवल्याचा आरोप लावण्यात आला होता, ज्यामुळे त्याला एकही सामना खेळता आला नाही. 

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, मोईन अली, शिवम दुबे, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, दीपक चाहर, राजवर्धन हंगारगेकर

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, केन विलियममसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, राहुल तेवतिया, राशीद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अल्झारी जोसेफ