गुरु शिष्याच्या लढाईत कोण ठरणार सरस? नाणेफेकीचा कौल गुजरातच्या पारड्यात, अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग XI

अहमदाबाद – इंडियन प्रीमियर लीग २०२३च्या (IPL 2023) रणसंग्रामाला काही मिनिटातच सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गतविजेत्या गुजरात टायटन्स संघात (CSK vs GT) आयपीएल १६ चा उद्घाटन सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही लढत होणार आहे. तत्पूर्वी संध्याकाळी ७ वाजता दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक झाली असून गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरेल.

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, मोईन अली, शिवम दुबे, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, दीपक चाहर, राजवर्धन हंगारगेकर

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, केन विलियममसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, राहुल तेवतिया, राशीद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अल्झारी जोसेफ