मुख्यमंत्र्यांना भर सभेत शिवीगाळ करणं दत्ता दळवी यांना भोवलं; पोलिसांनी केली अटक

Datta Dalvi Arrest : सत्ता आणि पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने ठाकरे गटाच्या नेत्यांचा तोल ढळत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. यातूनच मुख्यमंत्र्यांवर अतिशय खालच्या पातळीवरील टीका केली जात आहे.

दरम्यान, भांडूप मध्ये रविवार (दिनांक 26 नोव्हेंबर) शिवसेना ठाकरे गटाचा कोकणवासीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होता. या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर, उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आपत्तीजनक वक्तव्य केले होते. त्यामुळे आज सकाळी आठ वाजता भांडुप पोलिसांनी त्यांना विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक केली आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

भरसभेत मुख्यमख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना शिवीगाळ करणं दत्ता दळवी यांना भोवलं आहे. दत्ता दळवी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. भा.द.वि कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आता दत्ता दळव यांना अटक करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-