भगीरथ असं जायला नको होतंस…; जवळच्या सहकाऱ्याच्या निधनानंतर पंकजा मुंडे भावूक

बीड – भाजपचे बीड शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी (BJP Beed City President Bhagirath Biyani) यांनी राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून  आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या  घटनेनंतर त्यांना तत्काळ शहरातील फिनिक्स रुग्णालयात (Phoenix Hospital) नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. (BJP city president Bhagirath Biyani commits suicide in Beed) .

दरम्यान, भगीरथ बियाणी हे बीड शहरातील एमआयडीसी परिसरात (In MIDC area) राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, भगीरथ बियाणींनी आज (११ ऑक्टोंबर) सकाळच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. आता भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली?, यामागे काही राजकीय अथवा कौटुंबिक कारण आहे का?, याची चौकशी आता पोलीस करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी एक भावूक ट्वीट करत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. त्या म्हणतात, ‘बीड भाजपचे शहराध्यक्ष आणि माझा अत्यंत धडाडीचा कार्यकर्ता भगीरथ बियानी यांच्या दुःखद निधनाची बातमी अस्वस्थ आणि सुन्न करणारी आहे. भगीरथ असं जायला नको होतंस….’ असं म्हणत त्यांनी शोक व्यक्त केला आहे.