Lithium Reserves: भारताच्या हाती आला नशीब बदलून टाकणारा खजिना! चीन आणि ऑस्ट्रेलियाची बादशाहत संपणार

Lithium Reserves In India: भारताच्या खाण मंत्रालयाने सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचे मोठे साठे सापडले आहेत. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (GSI) ने पहिल्यांदाच दिल्लीच्या उत्तरेस ६५० किमी अंतरावर जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील सलाल-हैमाना भागात ५.९ दशलक्ष टन लिथियमचा (Lithium) साठा शोधला आहे.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

खाण मंत्रालयाने माहिती दिली की, लिथियम आणि सोन्यासह ५१ खनिज ब्लॉक राज्य सरकारांना सुपूर्द करण्यात आले आहेत. या ५१ खनिज ब्लॉकपैकी ५ ब्लॉक सोन्याशी संबंधित आहेत. जम्मू काश्मीर (केंद्रशासित प्रदेश), आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक या ११ राज्यांमध्ये पसरलेले इतर ब्लॉक पोटॅश, मॉलिब्डेनम, बेस मेटल इत्यादी वस्तूंशी संबंधित आहेत. जीएसआयने हे ब्लॉक्स २०१८-१९ च्या फील्ड सीझन पासून केलेल्या कामांच्या आधारे तयार केले होते.

याशिवाय, एकूण ७८९७ दशलक्ष टन संसाधनांसह कोळसा आणि लिग्नाइटचे १७ अहवाल कोळसा मंत्रालयाला सादर करण्यात आले. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने धोरणात्मक आणि महत्त्वाच्या खनिजांवर ११५ प्रकल्प आणि खत खनिजांवर १६ प्रकल्प स्थापन केले आहेत.

लिथियम महत्वाचे का आहे?
लिथियम हा एक धातू आहे ज्याचा वापर इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी बनवण्यासाठी केला जातो. मोदी सरकार देशातील सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांवर भर देत आहे. विशेषत: दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि बेंगळुरू या प्रमुख शहरांना इलेक्ट्रिक वाहनांवर अधिकाधिक अवलंबून ठेवण्याची योजना आहे. यासाठी लिथियमचा साठा असणे अत्यंत आवश्यक आहे.

सध्या, चीन आणि ऑस्ट्रेलिया हे जगभरात लिथियमचे प्रमुख पुरवठादार आहेत. त्यांच्याकडे असलेल्या लिथियमच्या प्रचंड साठ्यामुळे ते त्यांना हवे ते करतात. आता भारतातही लिथियमचे साठे सापडल्यानंतर त्यांच्या साम्राज्यावर परिणाम होणार हे निश्चित आहे.

जीएसआयची स्थापना १८५१ मध्ये झाली
रेल्वेसाठी कोळशाचे साठे शोधण्यासाठी १८५१ मध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून जीएसआय हे देशातील विविध क्षेत्रांमध्ये आवश्यक असलेल्या भूवैज्ञानिक माहितीच्या भांडारातच विकसित झाले नाही तर आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भूवैज्ञानिक संस्थेचा दर्जाही प्राप्त झाला आहे.