राहुल गांधींवर कसाबसारखा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून थेट पाकिस्तानला पाठवा – नितेश राणे

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयानं (Lok Sabha Secretariat)  काल जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, गांधी यांना सुरत न्यायालयानं (Surat Courts) दोषी ठरवल्यापासून म्हणजे 23 मार्च 2023 पासून लोकसभेसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. राहुल गांधी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8 (3) नुसार, कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरलेला आणि किमान दोन वर्षे कारावासाची शिक्षा झालेला खासदार किंवा आमदार दोषी सिद्ध झाल्याच्या तारखेपासून अपात्र ठरेल अशी तरतूद आहे.

दरम्यान, या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी- विरोधक आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यातच आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापुरात बोलताना ते म्हणाले,  परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींवर कसाबप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. राहुल गांधींना पाकिस्तानात पाठवा. ओबीसींच्या नावाने चुकीचं बोलता, मग संसदीय पद्धतीने कारवाई झाल्यावर बीजेपीच्या नावाने का बोंबलता? असे नितेश राणे म्हणाले.