Salman Khan : लॉरेन्स बिष्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी; सुरक्षेत वाढ

Salman Khan Security Review: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या (Gangster Lawrence Bishnoi) आणखी एका धमकीनंतर, मुंबई पोलिसांनी मंगळवारी सलमान खानला दिलेल्या सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच अभिनेत्याला सतर्क राहण्यास सांगितले. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर या अभिनेत्याला मुंबई पोलिसांनी आधीच वाय-प्लस सुरक्षा दिली आहे.

रविवारी बिश्नोईने फेसबुक पोस्टमध्ये कॅनडातील गिप्पी ग्रेवालच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुक अकाउंटचे मूळ भारताबाहेर होते.याआधी मार्चमध्ये सलमानला बिश्नोई गँगच्या सदस्याने पाठवलेला धमकीचा मेल आला होता. या संदर्भात मुंबई पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली होती आणि गुन्हाही नोंदवला होता. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) तपास केलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात बिश्नोई सध्या तुरुंगात आहे.

दरम्यान, सलमान खानचा ‘टायगर 3’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. या सिनेमात सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कॅफ (Katrina Kaif) मुख्य भूमिकेत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

राज्यातल्या दूषित वातावरणाला खोके सरकार जबाबदार, खोके सरकारने महाराष्ट्राचे राजकारण दूषित केले – सुळे

कर्णधार सापडला पण हार्दिकसारखा अष्टपैलू कसा सापडणार? या 5 खेळाडूंवर गुजरातची नजर असेल

आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही; सुप्रिया सुळे यांचा दावा

जाणून घ्या OnePlus 12 भारतात कधी लॉन्च होणार ?