David Miller : मिलरचे झंझावाती शतक कामी आले नाही, टीम इंडियाने सामना आणि मालिका जिंकली

IND vs SA:– गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने या तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. घरच्या मैदानावर खेळत टीम इंडियाने प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने प्रथम खेळून 20 षटकात 3 विकेट गमावत 237 धावा केल्या. प्रत्युत्तरात डेव्हिड मिलरच्या ( David Miller ) झंझावाती शतकामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला निर्धारित षटकांत केवळ 221 धावा करता आल्या.(David Miller : Miller’s century didn’t work, Team India won the match and the series)

238 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 221 धावाच करू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून डी कॉकने नाबाद ६९ धावांची खेळी केली. त्याचवेळी मिलरने 106 धावांचे शानदार शतक झळकावले. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही आणि भारतीय संघाने हा सामना 16 धावांनी जिंकला.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताने 238 धावांचे लक्ष्य दिले होते , भारतीय संघाने 20 षटकात 3 गडी गमावून 237 धावा केल्या. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ९.५ षटकांत ९६ धावा जोडल्या. रोहित शर्माने 37 चेंडूत 43 धावा केल्या, तर केएल राहुलने 28 चेंडूत 57 धावांचे योगदान दिले.

हे दोघे बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफानी फलंदाजी केली. सूर्यकुमार यादवने 22 चेंडूत 61 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 5 षटकार आणि 5 चौकार मारले. याशिवाय विराट कोहलीने 28 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. या फलंदाजांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताला 237 धावांची मोठी धावसंख्या उभारता आली. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हे लक्ष्य गाठता आले नाही आणि 221 धावा करून 16 धावांनी सामना गमावला.