राहुल गांधींचं भर पावसातलं भाषण, सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल; विरोधी गटात खळबळ

नवी दिल्ली – काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची सध्या बरीच चर्चा होताना दिसून येत आहे. भारत जोडो यात्रेचा रविवारी (2 ऑक्टोबर) कर्नाटक राज्यातला तिसरा दिवस होता. यावेळी राहुल गांधी यांनी संध्याकाळी मैसुरूमधील एपीएमसी मैदानावर एका सभेला संबोधित केलं. या सभेच्यावेळी प्रचंड पाऊस सुरू झाला, तरीही राहुल गांधी यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं.(Rahul Gandhi’s speech in heavy rain, video viral on social media)

आपल्या भाषणात त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मोठ्या प्रमाणावर टीका केली. राहुल गांधी यांच्या भर पावसातील भाषणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.अनेक नेते आणि कॉंग्रेस समर्थक हा व्हिडीओ आणि भाषण करतानाचा राहुल गांधी यांचा फोटो शेअर करत आहेत. स्वतः राहुल गांधी यांनीही आपल्या ट्विटर हँडलवरूनही हा व्हीडिओ शेअर केला आहे.

 

 

त्यांनी म्हटलं आहे की,  भारताला एक करण्यापासून आम्हाला कोणी अडवू शकत नाही. भारताचा आवाज उठविण्यापासून आम्हाला कोणी उडवू शकत नाही. कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत जाणाऱ्या भारत जोडो यात्रेला कोणी अडवू शकत नाही.