निलंबित पोलीस अधिकारी पराग मणेरेंची पुन्हा नियुक्ती; ठाकरे सरकारने केले होते निलंबन

Mumbai – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधित कथित खंडणी प्रकरणात महाविकास आघाडी सरकारने डीसीपी पराग मणेरे (Parag Manere) यांना निलंबित केले होते. पूर्वीचा निर्णय रद्द करत शिंदे, भाजप सरकारने पराग मणेरे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

परमबीर सिंग यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात महाविकास आघाडी सरकारने सेवेतून निलंबित केले होते. याच प्रकरणात डीसीपी पराग मणेरे यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आणि खंडणीचे आरोप झाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारने मणेरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना सेवेतून निलंबित केले होते. मात्र आता नवीन सरकार सत्तेत येताच पराग मणेरे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.