WPL 2023: ठरलं तर! ३.४० कोटी मिळालेली स्म्रीती मंधाना करणार आरसीबीचे नेतृत्त्व

बेंगलोर- वुमन्स प्रिमियर लीग २०२३ ची (WPL 2023) जय्यत तयारी सुरू आहे. पुरुषांच्या आयपीएलप्रमाणेच यंदा महिलांचा आयपीएल हंगामही मोठा होणार आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लिलावात भारताची धडाकेबाज सलामीवीर स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ३.४० कोटींच्या मोठ्या किंमतीला विकत घेतले होते. ती लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली. स्म्रीतीबरोबरच एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष आदी स्टार खेळाडूंनाही आरसीबीने आपल्या ताफ्यात घेतले. त्यामुळे स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघाची कमान कोणाच्या हाती सोपवण्यात येईल?, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

आता आरसीबीने (RCB Women’s Team Captain) त्यांच्या पहिल्या महिला कर्णधाराची घोषणा केली आहे. शनिवारी (१८ फेब्रुवारी) आसरीबीचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि विद्यमान कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plesis) यांनी मिळून चाहत्यांना ही बातमी ऐकवली आहे. स्म्रीतीला आरसीबीच्या महिला संघाचे नेतृत्त्वपद देण्यात आले आहे. स्म्रीतीने यापूर्वी भारतीय संघाचेही नेतृत्त्व केले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर( RCB’s team for WPL )-
स्म्रीती मंधाना, एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, रिचा घोष, एरिन बर्न्स, दीशा कसत, श्रेयंका पाटील, कनिका, ए शोबना, इंद्रानी रॉय, हिदर नाईट, डॅन व्हॅन निएकर्क, प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल झांझड, मीगन शुट, सहाना पवार

आरसीबी महिला संघाचा कोचिंग स्टाफ
मुख्य प्रशिक्षक – बेन सॉयर
सहाय्यक प्रशिक्षक व स्काऊटिंग प्रमुख – मलोलन रंगराजन
स्काऊट आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक – वनिता व्हीआर
फलंदाजी प्रशिक्षक – आरएक्स मुरली
संघ व्यवस्थापक व डॉक्टर – डॉ. हरिनी
थेरेपिस्ट – नवनिता गौतम