भारताला पदक मिळणार? हॉकीमध्ये भारताची कॅनडावर 8-0 ने मात

कॉमनवेल्थ गेम्स 2022 : कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) च्या सहाव्या दिवशी भारतीय हॉकी संघाने (Indian Hockey Team) कॅनडाविरुद्ध चमकदार कामगिरी करत कॅनडावर 8-0 ने मात केली आहे. भारताकडून हरमनप्रीत आणि आकाशदीपने (Harmanpreet and Akashdeep) प्रत्येकी दोन-दोन गोल केले. तर अमित, ललित उपाध्याय, गुरजंत आणि मनदीप यांनी प्रत्येकी एक गोल केला.

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाने (Australia) आतापर्यंत सर्वाधिक पदके जिंकली आहेत. त्यांनी एकूण 106 पदके जिंकली आहेत. यामध्ये 42 सुवर्णपदक आणि 32 रौप्य आणि 32 कांस्य पदकांचा समावेश आहे. तर इंग्लंड (England) 86 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड (New Zealand) 26 पदके जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे. भारत (India) पदक यादीत सहाव्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत 5 सुवर्ण पादकांसोबत 5 रौप्य आणि 4 कांस्य पदके जिंकली आहेत.