फक्त निवडणुकी पुरता भाजपाला छत्रपती हवे होते का? दिपाली सय्यद यांचा थेट सवाल 

मुंबई – सर्वपक्षांनी मिळून मला राज्यसभेवर निवडून द्यावं, असे आवाहन माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhaji Raje Chhatrapati)  केले होते. सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरु होती. शिवसेनेने संभाजीराजे यांना शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी ऑफर दिली होती. मात्र, संभाजीराजे यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेनेने मंगळवारी आपला उमेदवार जाहीर केला. त्यांच्याकडून कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार (Shiv Sena district chief Sanjay Pawar) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

संभाजीराजेंना उमेदवारी न दिल्याने मराठा संघटना आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पुढील काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते बाळासाहेब थोरात यांच्या घरावर चाल करुन जाणार असल्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता शिवसेनेच्या नवीन नेत्या दिपाली सय्यद यांनी केलेले एक ट्वीट मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे.

छत्रपती संभाजीराजे भाजपावर एवढे नाराज का आहेत ? भाजपातुन बाहेर जाण्याचा निर्णय त्यांनी का घेतला? भाजपा त्यांना थांबवून दुसरी जागा का देत नाही? फक्त निवडणुकी पुरता भाजपाला छत्रपती हवे होते का? याचे स्पष्टीकरण भाजपा ला द्यावेच लागणार! असं त्यांनी म्हटले आहे.