Sunil Tatkare | सामाजिक सलोखा न बघवणारे धर्म-जातीजातीमध्ये मतांच्या बेगमीसाठी अंतर निर्माण करत आहेत

Sunil Tatkare | सामाजिक सलोखा ज्यांना बघवत नाही ते धर्माधर्मामध्ये… जातीजातीमध्ये मतांच्या बेगमीसाठी अंतर निर्माण करत आहेत असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी महाड शहरातील जाहीर प्रचार सभेत सोमवारी केला.

अयोध्येत राममंदिर झाले. त्याचसोबत अयोध्येत बाबरी मशीदचेही काम सुरू आहे हे कधी ते लोक सांगत नाहीत मात्र मुस्लिम समाजाच्या मतांसाठी व्हॉटसअपच्या माध्यमातून मेसेज केले जातात. सामाजिक सामंजस्य जपणारे आम्ही आहोत परंतु कुणी कुणाच्या नावाने दंगा करण्याचा प्रयत्न करतील तर त्यांचे धंदे काढायला मला वेळ लागणार नाही असा स्पष्ट इशाराही सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी यावेळी दिला.

फाळणी होत असताना शेजारच्या देशात गेले त्यांना मातृभूमीत परत यायचे असेल तर त्यांच्या वास्तव्याची अट शिथिल केली हा सीएएचा कायदा आहे. या देशातील राष्ट्रभक्त मुस्लिमांमध्ये चुकीचे काही घडणार नाही. माझे आवाहन आहे उध्दव ठाकरे, अनंत गीते यांना की त्यांनी सीएए कायदा काय आहे हे जनतेला सांगावे. पण समाजासमाजामध्ये जाणीवपूर्वक अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न ही जातियवादी मंडळी करत आहे अशी घणाघाती टीका सुनिल तटकरे यांनी केली.

व्हॉटसअप मेसेज निमित्ताने आमच्यामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर या परिसरातील, देशातील, राज्यातील मुस्लिम समाजाने आमचा धर्मनिरपेक्ष विचार बघावा असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समानता दिली त्यामुळेच या देशामध्ये लोकशाही व्यवस्था जिवंत आहे. देशामध्ये स्थैर्य आणि अस्थैर्य कसे होते याचे उदाहरण देत सुनिल तटकरे यांनी यावेळी राजकारणाचा संपूर्ण इतिहासच जनतेसमोर मांडला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या या राजधानीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक हूंकार महाडच्या नगरीमधून दिला तिथे सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम होतेय असेही सुनिल तटकरे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन