Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’तर्फे वेद विज्ञान महाविद्यापीठास स्कूल बस भेट

इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्यावतीने (Indrani Balan Foundation) शिखर शिंगणापूर (ता. माण, जि. सातारा) येथील वेद विज्ञान महाविद्यापीठ संचलीत श्री ज्ञानमंदिर शाळेला स्कूल बस देण्यात आली. फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते स्कूल बसची चावी संस्थेकडे देण्यात आली.

‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ (Indrani Balan Foundation) आणि ‘पुनीत बालन ग्रुप’चे राज्यभरच नाही तर देशभरात विविध क्षेत्रात मोठे सामाजिक कार्य आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा झेंडा अगदी काश्मीरपर्यंत डौलाने फडकत आहे. यामध्ये शैक्षणिक, अध्यात्मिक, क्रिडा, सामाजिक कार्याचा समावेश आहे. पोलिस विभाग आणि लष्करासोबतही त्यांनी आपल्या सामाजिक दायित्वाचे कर्तव्य निभावले आहे. त्याचाच भाग म्हणून शिखर शिंगणापूर येथेही वेद विज्ञान महाविद्यापीठ संचलीत सुरु असलेल्या श्री ज्ञानमंदिर शाळेसाठी ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या माध्यमातून ४१ आसन क्षमता असलेली स्कूल बस देण्यात आली. दुष्काळी भाग असलेल्या शिखर शिंगणापूर परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थींनींना या स्कूल बसचा उपयोग होईल आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांची प्रगती होण्यास मदत होणार आहे. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे अपेक्स मेंबर राजय शास्तारे, आदित्य जोशी, अमोल येवले आणि महेश सोनी यांच्यासह संस्थेचे विश्वस्त मंडळ उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, मुरलीधर अण्णांचा विश्वास

Narendra Modi : शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ, नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

Vijay Shivtare : सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी मिळाल्यावर किती बदल झाला, खासदार झाल्यावर तर काय होईल?