Neelam Gorhe | पुण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने भरघोस निधी देत अनेक विकासात्मक कामे पूर्ण केली

पुणे | शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, आज पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा निवडणूक अर्ज भरण्यात आले. पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या चारही उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे महायुतीचे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

पुणे शहरात आजवर सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांचाही चांगला संपर्क राहिलेला आहे. जिल्हा नियोजन समितीच्याद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणि शासन स्तरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रो, सरकारी दवाखान्यांचे अद्ययावतीकरण यांसारखे विविध विकासात्मक कामे पुणे शहरात केलेली आहेत. पुण्याचा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या गणेशोत्सवावेळी मंडळांना परवानगीसाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात पण ज्याक्षणी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर दहीहंडी, गणेशोत्सव यांसारख्या उत्सवाला असणाऱ्या अटी शिथिल करून त्या लोकाभिमुख केल्या आहेत. पाच वर्षांसाठी एकदाच परवाना देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे पुण्यातील सर्व मंडळांना विनासायास परवाना मिळाला आहे. दहीहंडी संदर्भातील नियमावलीत देखील बदल करून ज्या गोविंदाचा अपघात झाला त्यांना विमा कवच मिळवून दिले आहे. याखेरीज देहू, आळंदी, जेजुरी यांसह अनेक तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यासोबतच जिल्हा नियोजनमधील निधी हा दुर्गकिल्ले यांच्या दुरुस्तीकरिता वापरण्याची अंमलबजावणी यावर्षीपासून करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

पुणे हे शैक्षणिक केंद्र आहे उच्च व तंत्र शिक्षण खात्याच्यावतीने अनेक शैक्षणिक संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा निश्चितच होणार आहे.

येथील केळकर संग्रहालय, शनिवारवाडा, शिवसृष्टी, सावित्रीबाई फुले स्मारक यांसारखे अनेक गोष्टींच्या विकासाकरिता महायुती सरकारने निधी दिलेला आहे. पुणे शहरातील टेकड्या वाचविण्याचे काम सुद्धा पुणे महापालिकेने केलेले आहे. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून टेकड्यांवर वन लावण्याच काम करण्यात आलेले आहे. वेताळ टेकडीवरील रस्त्याच्या मुद्द्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घालून त्या कामाला स्थगिती दिलेली आहे. टेकड्यांचं संरक्षण करण्याचं काम पुणे महानगरपालिका आणी राज्य सरकारने योग्यपणे केले आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्याचं काम ‘स्वच्छ’ या संस्थेला देण्यात आले. जेणेकरून शहरात स्वच्छता ठेवली जाईल.

महाराष्ट्रात ८ लाख ५० हजार कोटींच्या पायाभूत सुविधा निधी केंद्र सरकारने तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४ लाख ४ हजार ५७६ घरे पूर्ण केलेली आहेत. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता ३१ हजार कोटी रुपयांची शिष्यवृत्ती सरकारने दिली आहे. १२ लाख ५४ हजार ८३ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. याखेरीज बार्टी, सारथी, महाज्योति यांच्या प्रश्नांबाबत देखील शासन संवेदनशील असल्याचे शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच