केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे : अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) हिने आक्षेपार्ह फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर टीका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे . राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे (Nationalist Women’s Congress Party Pune) यांनी आज केतकी चितळे हिच्यावर गुन्हा दाखल (Filed a crime) करण्याची मागणी केली आहे . सासवड पोलीस स्टेशन (Saswad Police Station) चे पोलीस निरीक्षक घोलप यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली .

केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्याचा मागणीचे निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाग अध्यक्षा वैशाली नागवडे , पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा भारती युवराज शेवाळे यांसह राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होत्या .

काय आहे नेमके प्रकरण :

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात फेसबुकवर एक कविता शेअर करत टीका केली होती . या फेसबुक पोस्ट मुळे केतकी चितळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे . या पोस्ट नंतर सोशल मीडियावर केतकीला मोठ्या प्रमाणावर ट्रोल (troll) देखील केलं जात आहे . केतकी च्या या आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक होताना दिसत आहे . केतकी चितळे वर गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत .