‘हा लव्ह जिहाद…’, पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर प्रकरणावरुन ओवैसींनी उपस्थित केले प्रश्न

पब्जी गेम खेळणारा भारतीय तरुण सचिन चार मुलांच्या पाकिस्तानी आई सीमा हैजर हिच्या प्रेमात पडला. ही महिला प्रेमात इतकी वेडी झाली होती की, ती अवैधरित्या तिच्या चार मुलांसह भारतात आली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली. ही बातमी दोन्ही देशात वाऱ्यासारखी परसली. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बुधवारी (१२ जुलै) सीमा हैदर प्रकरणाबाबत समान नागरी संहितेचा (यूसीसी) उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूसीसीवरील वक्तव्याबाबतही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.

एआयएमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी महाराष्ट्रातील नांदेडमध्ये म्हणाले, “पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण लव्ह जिहाद नाही का? सीमाने कोणत्या कायद्यानुसार लग्न केले? अशा स्थितीत भाजप पुन्हा युसीसीबाबत बोलत आहे. बीएसएफ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमा नेपाळमार्गे भारतात कशी आली याची चौकशी करावी? सीमा हैदरने तिच्या पहिल्या पतीला न सोडता लग्न कसे केले?” असे प्रश्न ओवैसींनी उपस्थित केले.

ओवैसी म्हणाले, “पीएम मोदी म्हणतात एका घरात दोन कायदे कसे असतील? हे चुकीचे आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये सीआरपीसी अद्याप लागू नाही. हिंदू अविभक्त कुटुंबांतर्गत इतर समाजातील लोकांना कर सवलत का मिळत नाही? आपल्या सर्व हिंदू बंधू भगिनींना UC आल्याने त्रास होईल. हिंदू विवाह कायदा आणि हिंदू उत्तराधिकार कायदा हे सर्व निघून जातील. हिंदू अविभक्त कुटुंबांतर्गत हिंदू भावंडांना मिळणाऱ्या कर सूटचा लाभही निघून जाईल.