‘दात तोडायचेच असतील तर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले अर्पण करणाऱ्यांचे तोडून दाखवा’

मुंबई – एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी (MIM leader Akbaruddin Owaisi) नुकतेच औरंगाबादच्या दौऱ्यावर होते . या दौऱ्यादरम्यान त्यांनी शहरातील धार्मिळ स्थळ आणि दर्ग्यांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे त्यांनी स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या मुगलसम्राट औरंगजेबच्या (Aurangzeb) कबरीवर फुले वाहिली आणि ते नतमस्तक झाले. (Akbaruddin Owaisi at the tomb of Aurangzeb)

सुरुवातीला त्यांनी एका मस्जिदीत नमाज देखील अदा केली. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ), एमआयएम नेते वारीस पठाण आणि स्थानिक नेत्यांसह अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर गेले. कबरीवर फुलं वाहून ( Owesani laid flowers at Aurangzeb’s tomb ) पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्थ झाले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरुन आता दिल्लीत असलेल्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर CM Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.

त्या म्हणाल्या, हनुमान चालिसा (Hanumaan Chalisa) म्हणणे राजद्रोह आहे तर औरंगजेबाच्या कबरीवर फुले अर्पण करण्याला काय म्हणाल ? उद्धव ठाकरेंच्या नावाने आलेले महाराष्ट्रावरचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी हनुमान मंदिरात आरती करणार आहोत. त्यांनी मला वज्र द्या मी दात तोडण्याचे काम करेन असे सांगितले आहे. माझ्या महाराष्ट्राच्या जनतेचे दात तोडण्याची गरज नाही. जर दात तोडायचे असेल तर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले अर्पण करणाऱ्यांचे तोडून दाखवा. तेव्हाच तुमच्यात हिंदुत्व जिवंत आहे, यावर आमचा विश्वास बसेल,” असे नवनीत राणा म्हणाल्या.